वारी - सुनील मरभळ यांचे भावपूर्ण #भक्तिगीत। पंढरीच्या विठुरायाला भेटण्याची दिव्य उत्कंठा असणारे अविश्स्मरणनीय #BhaktiGeet https://www.youtube.com/watch?v=sq_1109TerU&feature=youtu.be
आषाढी एकादशीला पंढरपुरात वारकऱ्यांची गर्दी होते. या लाखो वारकऱ्यांच्या/भक्तांच्या मनातला भक्तिभाव, एका खास भक्तिगीताच्या रूपाने आपल्या कानांतर मंतरला आहे सुनील मरभळ यांनी. आषाडी एकादशी वारीच्या निमित्ताने तयार केलेलं हे गीत संतोष सावंत यांनी संगीत बद्ध केले तर संगीत संयोजन
परेश राजपूत यांचं आहे. आपल्या भक्तीगीतांची जादू घेऊन सुनील मरभळ यांनी त्यांचं नाव कोरसकार आणि संगीतकारांसोबत गुंफून घेतलं आहे. सुमधुर स्वरांचे कोरस गायक या गीताला लाभले... उदय पाटील, संतोष सावंत आणि सपना हेमन यांच्या सुमधुर स्वरांची प्रचिती या गीतात येते.
संगीत आणि गीताच्या संकल्पनेचा मेळ घालून संगीतमय जादू यात झाल्याचे दिसते. गीतकार "ढवळा ढेंगळे" यांचे हे गीत संतोष सावंत यांनी संगीतबद्ध केले आहे. हे भक्तिगीत सुनील मरभळ यांच्या स्वरांतून अधिकच खुलले आहे. या गीताचे ध्वनी मुद्रण विधी साउंड स्टुडियो येथे श्रीकृष्ण सावंत यांनी केलं आहे.
"वारी" हे गीत सगळ्यांच्या भक्तीचं निरूपण करणारं आहे. विठू माऊलीच्या दर्शनासाठी, रखुमाईच्या दर्शनासाठी, चंद्रभागेच्या स्नानासाठी वाळवंटी हरिनाम गायायला हि वारी चालली आहे असे या गीतात म्हंटले आहे.
पेरणी झाल्यानंतर यात्रेत जाऊन भक्तांचं मन एक नवं उत्कंठेने भरतं. गावकुसातून पांदीच्या वाटेने पाय हळूच विठुरायाच्या पंढरीकडे वळू लागतात. या वारीच्या वाटेवर सर्व सानथोरांच्या पाऊलखुणा उमटू लागतात. सुनील मरभळ यांचं स्वर असंख्य भक्तांच्या मनात प्रवाहित होत आहेत.
अगदी मनापासून गायक सुनील मरभळ यांनी हे गाणे गायले आहे. त्यामुळे आपसूकच ऐकणाऱ्यांचे ध्यान "वारी" या गीताकडे येते. गाणे ऐकणाऱ्याला आकर्षीत करून घेते. वारी हे भक्तिगीत ऐकल्याने एक वेगळाच आनंद मनात दरवळू लागतो. मन प्रसन्न होते. हे "वारी" भक्तीगीत आपल्याला आवडल्यास नक्कीच आपल्या मित्रांनाही शेअर करा.
सुनील मरभळ यांना या "वारीच्या रूपाने" विठ्ठलाच्या दिव्य भेटीची जणू प्रचितीच आली आहे. म्हणूनच ते आपले स्वर विठुरायाच्या चरणी समर्पित करतात.
वारकऱ्यांच्या भक्ती भावाचं दर्शन सुनील मरभळ यांनी घडवून आणले आहे. वारीचं महत्व या भक्तिगीतांच्या माध्यमातून प्रदर्शित करण्याचा त्यांनी हा प्रयत्न केला आहे.
आपल्याला आवडलेल्या वारकऱ्यांच्या फुटेज या गीतात व्हिडिओ रूपाने मांडल्या आहेत. गायक सुनील मरभळ यांचं निर्माता म्हणूनही विशेष योगदान आहे. या गीतांमध्ये विठ्ठलाच्या भक्तांच्या भक्तिभावांचं छायाचित्रण करण्यात आलं आहे.
निर्मिती व्यवस्था आणि दिग्दर्शन सहाय्य धनंजय ब्रिज यांनी सुंदरपणे केलं आहे. या गीतामध्ये सर्वांचे काम आपल्याला नक्कीच आवडेल. वारी या गीताला प्रोत्साहन देण्यासाठी आपण नक्कीच हे गीत बघावे.
0 Comments