नमस्कार मित्रांनो
टाईमपास न करता मुख्य विषयाला हात घोलणारे आपल्या चॅनेलचा हा व्हिडीओ शेवटपर्यंत बघावा. कारण या व्हिडीओत आपल्या सर्व प्रश्नांची आपल्या कमेंटच्या आधारावर उत्तरे देण्यात आलेली आहेत.
कमेंट - खूप कागदपत्र पाहिजेत सहजतेने पैसे मिळणार नाहीत.
तर मित्रांनो योजना या सरकारी असतात. सरकारी यंत्रनेत योजनांचा फायदा हा लाभार्थीलाच होण्यासाठी तो पैसा दुसऱ्या कुणाच्या हाती न जाता योग्य व्यक्तीपर्यंतच पोहोचावा हा उद्देश असतो. त्यामुळे कागदपत्रांचा आधार घेवून खात्री केली जाते की योजना योग्य उमेदवारांनाच लाभ देत आहे ना? कारण योग्य महिलेपर्यंत योजनेचा फायदा मिळावा हाच उद्देश आहे. योजनेचा पैसा दुसरीकडे वळता होऊ नये याची काळजी सरकारला असते. शेवटी योजना यशस्वी करायची असेल तर राजकीय व्यवस्थेची इच्छाशक्ती हवी आणि शासनाच्या अधिकारी कर्मचाऱ्यांनी योग्य काम केल्यास सर्वकाही शक्य आहे.
धन्यवाद दादा खूपच छान माहिती समजावून सांगितली बरं का तुम्ही पुन्हा एकदा धन्यवाद आभार
आपण आपला अभिप्राय दिल्याबद्दल खूप आभारी आहोत निर्मला दूधे मॅडम, यानंतर चांगल्यात चांगला कंटेन्ट देण्याचा आपल्या चॅनला प्रयत्न राहिल. असेच प्रोत्साहन चॅनलच्या पाठिशी असून द्या. धन्यवाद
रवि मेश्राम साहेब, जन्म दाखला नसला तरी चालेल, शाळेचा दाखला त्यासाठी पूरेसा आहे. जन्मदाखल्याला पर्यायी कागदपत्रांसाठी हा व्हिडीओ बघावा. आणि या योजनेत सहभागी होण्यासाठी बरीच कागदपत्रे सोपी करण्याचा सरकारने प्रयत्न केलेला आहे.
माझ्या मतदान कार्ड वर नाव त थोडे चूक आहे मी सर्व कागदपत्रे दिली आहे पणं माझं काम झाले नाही Reply
दादा माझा फोम ईलशनकाड नांव चूक आहे आधारकार्ड वर रेशनकार्ड बैंकेत लीक आधारकार्ड नाव बरोबर आहे या सर्व कागदपत्रे बरोबर आहे माझे काम होईल का
dfsdfdsfdsfdsfdsfdsfdfdsfds
अलका देशमुख मॅडम मतदान कार्ड जोडू नका. जर आपल्याला माहिती आहे की आपले नाव मतदान कार्डावर चुकलेले आहे तर मतदान कार्डऐवजी दुसरे पर्यायी कागदपत्र आहेत ते जोडा. ज्या कागदपत्रांवर नाव पत्ता जन्मतारिख बरोबर आहे तेच कागदपत्र जोडा. पर्यायी कागदपत्रासाठी हा व्हिडीओ बघावा.
नारीशक्तीचा प्रकार कोणी कोणता निवडावा हे समजत नाही plz
सारिका सुतार मॅडम ॲपमध्ये नारिशक्तीचा प्रकार आहेत. त्यातला
फॉर्ममध्ये चुकीचा डॉक्युमेंट अपलोड झाला परत फॉर्म भरू काय?
आपल्याला परत फॉर्म भरण्याची गरज नाही. ॲपमध्ये लॉगिन केल्यावर डॅशबोर्डच्या खालच्या बाजुस यापूर्वी भरलेले अर्ज यावर क्लिक केल्याने आपण भरलेल्या अर्जांची यादी समोर येईल. त्यात आपण एडीट करू शकता. आता फॉर्म एडीट करणे सोपे झाले असून एक लक्षात ठेवा की फॉर्म फक्त एकदाच एडीट करता येतो. अधिक माहितीसाठी हा पूर्ण व्हिडीओ बघावा
खूप खूप धन्यवाद सर सदर माहिती साठी😊🙏
निलेश कुंभार साहेब आपलेही आभार आपण सदैव या चॅननला प्रोत्साहित करत आहात.
लाडक्या बहिण योजनेच्या संदर्भात अतिशय महत्वपूर्ण माहिती या व्हिडीओच्या माध्यमातून आपल्याला मिळत आहे.
अनेक माता भगीणींचा हा प्रश्न होता की फॉर्म चुकला तर काय होईल. माझा फॉर्म चुकलेला आहे. हे कागदपत्र चुकलं, ते कागदपत्र राहिलं, एखाद नाव चुकलं.
आधार कार्ड ऐवजी माझ्ं रेशन कार्ड गेलं. त्याठिकाणी चुकुन उत्पन्नाचा दाखला जोडला.
अशा अनेक प्रश्नांची उत्तर मी तुम्हाला या व्हिडीओच्या माध्यमातून देणार आहे.
चला स्वागत आहे आपलं आपल्या चॅनलमध्ये
या युट्युब चॅनेलवरील हा व्हिडीओ मात्र सर्वांनी शेवटपर्यंत बघायचा आहे.
कारण आजचा व्हिडीओच असा आहे की जर आपला फॉर्म चुकला असेल आणि आपल्याला भिती वाटत असेल की माझे 1500/- रूपये मला प्रत्येक महिन्याला येणार नाहीत.
अशा वेळी आम्ही काय कराव? या सर्व प्रश्नांची उत्तरं या व्हिडीओच्या माध्यमातून मी आपल्याला देणार आहे.
आता सर्वात पहिले लक्षात घ्या. आपल्याला नारीशक्ती दूत हे ॲप डाऊनलोड करायचे आहे.
या नारिशक्ती दुत ॲपच्या माध्यमातून हा फॉर्म भरायचा आहे. अनेक माताभगीणी या ठिकाणी फॉर्म भरत आहेत.
सेतू सूविधा केंद्रावाले असतील, किंवा आपण सर्वचजण या विडीओत सांगितलेल्या गोष्टींची काळजी घ्यायची आहे.
मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेची अधिकृत वेबसाईट लवकरच चालू होत आहे.
या पोर्टलच्या माध्यमातून फॉर्म भरणे अधिक सोपे होणार आहे.
चॅनलला आपण सबक्राईब असाल तर आपल्याला लवकरच व्हिडीओच्या माध्यमातून कळविण्यात येईल.
पण नेमका फॉर्म चुकला तर आपण काय करायच?
तर आता फॉर्म चुकल्यामुळे किंवा चुकीचे डॉक्युमेंट अपलोड झाल्यामुळे माझे पैसे येणार की नाही?
त्यासाठी काय कराव लागणार? या सर्व प्रश्नांची उत्तर या व्हिडीओत आपण बघणार आहोत.
हा व्हिडीओ आपण शेवटपर्यंत पहायचा आहे.
त्यासाठी हा व्हिडीओ जास्तीतजास्त लोकांना शेअर करा.
बाकी सर्वांना आवडला तर सर्वजण लाईक करणारच आहेत.
तर मित्रांनो आपला फॉर्म चुकला जरी असेल तरी काळजी करू नका.
कारण आता नाशिक्ती ॲपमध्ये फॉर्म एडीटचे ऑप्श्न आले आहे.
त्यामुळे तुम्ही घरबसल्याही तुमचा फॉर्म एडीट करू शकता.
आधि आपण भरलेला फॉर्म व्यवस्थित तपासून घ्या.
भरलेला फॉर्म चुकीचा आहे की बरोबर आहे याची खात्री करा.
त्यात काय चुकलेलं आहे ते बघा. त्यातल्या सगळ्या चुका एकदाच बघून घ्या.
फॉर्ममध्ये सर्वकाही बरोबर असेल तर फॉर्म सबमिट करा.
काही बदल करावयाचा असल्यास फॉर्मच्या एडिट बटणवर क्लिक करून बदल करून घ्या.
तर चला आता फॉर्म चुकलाय तर त्याच्यासाठी आता काय करायचं?
तर आधी प्ले स्टोअरला जावून नारीशक्ती दूत हे ॲप अपटेक करून घ्या.
नारीशक्ती दूत हे ॲप अपटेक केल्याने या ॲपमध्ये केलेले नवीन बदल आपल्या मोबाईलच्या ॲप मध्ये अपटेड होतील आणि आपल्याला अनेक ऑप्श्न यात बघायला मिळतील.
जर कुणी म्हणत असेल की आमच्याकडे ऑलरेडी ॲप डाऊनलोड आहे. तरीसुध्दा हे नारिशक्ती दूत हे ॲप अपडेट करणे गरजेचे आहे. नरिशक्ती ॲप अपडेट केले नाही तर नवीन बदल आपल्याला दिसणार नाहीत.
तेव्हा सर्वात आधि ॲप अपडेट करा. आणि नवीन बदल बघण्यास तयार व्हा.
ॲप चालू करून आपला नंबर टाका. टर्म आणि कंडिशनचे बटनवर टीक करून सहमती दर्शवा. ओटीपीसाठी बटनवर क्लिक करा.
ओटीपी आल्यावर तो ओटीपी टाकून ॲप चालू होईल.
आता अत्यंत महत्वाचे आणि लक्षात ठेवण्याजोगे.
ॲपवर फॉर्मचा अपडेट ऑप्श्न आलेले आहे.
फॉर्ममध्ये दुरूस्ती फक्त एकदाच करता येणार आहे.
परत परत दुरूस्ती किंवा अनेकदा दुरूस्ती करता येणार नाही.
तेव्हा जो काही बदल करायचा आहे तो एकदाच करावा लागणार आहे.
त्यानंतर हे ऑप्श्न लॉक होईल आणि परत दुरूस्ती करता येणार नाही.
तर जे काही चुकले असेल ते एकदाच व्यवस्थित बघून घ्या आणि एकदाच सगळ्या दुरूस्त्या करून घ्या.
परत फॉर्म चुकला तर दुरूस्ती करता येणार नाही हे लक्षात घ्या.
नवीन अपडेट चा व्हिडीओ लवकरच येत आहे. असून चॅनलला सबक्राईब करा.
जर खरच फॉर्म चुकला असेल तरच एडीट हा पर्याय वापरा. अ
अन्यथा आपला फॉर्म बरोबर असेल तर उगाचच फॉर्म अपडेट किंवा रिसबमिट करू नका.
खरच फॉर्म चुकला असेल तरच अपडेट करा.ृ
ही माहिती महत्वाची वाटत असेल तर सर्वांना हा व्हिडीओ शेअर करा.
आपल्या मैत्रिनींना, नातेवाईकांना, आपल्या कुटूंबाच्या व्हाटसॲप ग्रुप वर किंवा आपल्या सगळ्या व्हॉटस्अप ग्रुप वर शेअर करा.
आता आपण नारिशक्ती ॲप ओपन केल. लॉगिन केल्यावर डॅशबोर्डवर बॉटमला डाव्याबाजूला यापूर्वी केलेले अर्ज असं ऑप्शन येईल. अर्ज चुकला असेल तर नवीन अर्ज भरू नका.
अर्जात चूक झाली असेल तर नवीन अर्ज भरण्याची गरज नाही.
ॲपच्या बॉटम साईटला एक बटन आहे यापूर्वी भरलेले अर्ज. त्यावर क्लिक करून भरलेल्या अर्जात दूरूस्ती करता येणार आहे. दूरूस्ती एकदाच करता येणार आहे. म्हणून यापूर्वी भरलेल्या अर्जाला क्लिक करून भरलेल्या अर्जामध्ये दूरूस्ती करायची आहे. काही लोक अर्ज चुकला की नवीन अर्ज भरतात. तर तसे करू नका. यापूर्वी भरलेल्या अर्जाला दुरूस्त करा.
यापूर्वी भरलेले अर्ज याला क्लिक केले की आपण जेवढे अर्ज भरलेले आहेत याची यादीच समोर येते.
याचा अर्थ असा आहे की एका ॲपवरून आपण कितीही फॉर्म भरू शकतो.
प्रत्येक अर्जाला नवीन मोबाईल आणि नवीन ॲप डाऊनलोड करण्याची गरज नाही.
एकदा ॲप डाऊनलोड केला की तूम्ही त्या ॲपवरून अनेक अर्ज करून शकता.
म्हणजेच कितीही अर्ज भरू शकता.
अस नाही की जर का मी एकदा ॲप डाऊनलोड केले की एकच अर्ज भरू शकतो किंवा एकच अर्ज भरू शकते. तर लक्षात ठेवा तूम्ही कितीही अर्ज एकाच मोबाईलद्वारे एकाच ॲपवरून भरू शकता.
तर पहिली गोष्ट ही कि आपण एकाच मोबाईलमधून कितीही फॉर्म भरू शकता आणि
दुसरी महत्वाची गोष्ट आपण कितीही चुकलेले फॉर्म दूरूस्त करू शकता.
होय आपण एकाच मोबाईलवरून एकाच ॲपद्वारे कितीही चुकलेले फॉर्म दूरूस्त करू शकता.
पण लक्षात ठेवा थोड्यावेळापूर्वी सांगितल्याप्रमाणे आपल्याला दुरूस्ती एकदाच करता येणार आहे. म्हणजेच एका फॉर्ममध्ये एकदाच दुरूस्ती करता येणार आहे. म्हणून एकाच फॉर्ममधील अनेक दुरूस्त्या एकदाच करून घ्यायच्या आहेत. आणि गरज असेल तरच दुरूस्ती करायची आहे. विनाकारण बरोबर असलेल्या फॉर्मवर दूरूस्तीचा प्रयोग करू नका.
दुरूस्ती बद्दल काही समजत नसेल तर सेतू सुविधा केद्रावर जावून तेथिल कर्मचाऱ्यास सविस्तर फॉर्मद्वारे बदल किंवा दूरूस्ती करवून घ्या. आणि एकदाच फॉर्म दुरूस्त करून घेता येतो हे लक्षात ठेवा.
ॲपद्वारे फॉर्म दुरूस्त करताना ॲपमध्यू खालच्या बाजूस यापूर्वी भरलेले अर्ज या ऑप्श्नवर क्लिक केल्यावर आपण भरलेल्या फॉर्मची यादीच येते.
यामध्ये Edit नावाचे ऑप्श्न येते SMS verification done बटनच्या बाजूला ॲपच्या वरच्या उजव्या बाजूस आहे.
या यादितील फॉर्मवर क्लिक केल्यास समोर पूर्ण डॅशबोर्ड दिसते. आणि त्याचबरोबर एक मेसेजपणे आहे. हाच तो मेसेज त्यामध्ये सांगितलेले आहे की फॉर्ममध्ये एकदाच बदल करण्यात येईल.
भरलेल्या अर्जामध्ये फक्त एकदाच बदल करता येईल.
समजून घ्या आपल्याला एकदाच बदल करता येत असल्याने चुकलेली सगळी दुरूस्ती एकदाच करून घ्यावी लागणार आहे.
जेकाही चुकले असेल सगळे एकदाच दुरूस्त करून घ्यावे लागणार आहे.
पुन्हा दूरूस्तीची संधी नसल्याने एकदाच बदल करणे अनिवार्य आहे. याठिकाणी ओके बटणवर क्लिक करायच.
कुणाचं नाव चुकलंय,
कुणाचा मोबाईल नंबर चुकलाय,
कुणाचे रेशनकार्ड चुकलंय,
कुणाचं आधार कार्ड चुकलंय,
कुणाचा आधार कार्ड नंबर चुकला,
कुणाचं डाक्युमेंट चुकीच्या ठिकाणी अपलोड झालंय,
कुणाचे इतर कागदपत्र चुकलेत,
कुणाची बँक डिटेल चुकलीय,
कुणाचे बँक खाते चुकलेय,
कुणाचा पत्ता चुकलाय,
कुणाचं वडिलांऐवजी पती किंवा पतीच्या ऐवजी वडील असे काहीतरी चुकलं आहे,
सगळं बदला. परंतू चुकलेला फॉर्म दूरूस्तीसाठी एकच चान्स आहे हे मात्र लक्षात ठेवा.
या सगळ्या गोंधळात एक लक्षात ठेवा कि लाभार्थी हा महाराष्ट्राचा 15 वर्षांपूर्वीचा रहिवाशी हवा.
रहिवाशी प्रमाणपत्र नसेल तर त्याऐवजी 15 वर्षांपूर्वीचे केशरी रेशनकार्ड किंवा पिवळे रेशनकार्ड सबमिट करायचे आहे.
आणि ज्या महिला दुसऱ्या राज्यातून आलेल्या आहेत परंतू त्यांचे महाराष्ट्रातील पूरूषा सोबत लग्न झालेले आहे त्यांनी मात्र लग्नाचे प्रमाणपत्र आणि आपल्या पतीचे इतर कागदपत्र सबमिट करायचे आहेत.
अर्थात पती महाराष्ट्राचा 15 वर्षांपर्वीचा रहिवाशी हवा.
नवीन लग्न झालेल्या महिलांना मॅरेज सर्टीफिकेट जोडणे गरजेचे आहे. परराज्यातून विवाह करून आलेल्या महिलांनी विवाह नोंदणी प्रमाणपत्र सादर करणे गरजेचे आहे.
अपलोड केलेली कागदपत्रे चुकले असतील तर त्यावर लाल रंगाची X फूली आली असेल तर ते कागदपत्र पुन्हा अपलोड करा. लाल रंगाची X फूली याचा अर्थ हे कागदपत्र तुम्हाला परत अपलोड करायचे आहे.
लक्षात ठेवा
अपलोड करण्यापूर्वी आधारकार्ड, पॅनकार्ड, रेशनकार्ड किंवा इतर कागदपत्र अपलोड करण्यासाठी प्रत्येकी एकच ऑप्श्न असल्याने फ्रंट साईड आणि बँकसाईड या दोन बाजू एकत्र करून एकच ईमेज तयार करून घ्यायची आहे.
आधारकार्डच्या दोनही बाजू एकाच वेळी एकाच ईमेजमध्ये तयार करून अपलोड करायच्या आहेत.
रेशनकार्डच्या समोरची बाजू आणि पाठिमागच्या पानाची बाजू दोन फोटो एकत्र करून घेवून अपलोड करायचे आहे.
पॅनकार्ड असेल तर त्याची फ्रंट साईड आणि बॅक साईड आधी एकत्र करून घ्यायची आहे. आणि नंतर अपलोड करायची आहे.
आता जाणून घेवूया हमी पत्राविषयी
हमी पत्र सर्वांना वेगवेगळे नाही. हमीपत्राचा फॉरमॅट हा एकच असून तो खालील लिंक वरून डाऊनलोड करून घ्यावा.
डाऊनलोड केलेल्या हमीपत्राची प्रिंट काढा आणि त्यावर सही करून त्याचा फोटो काढून तो ॲपमधील ऑप्श्नवर जाऊन अपलोड करायचा आहे.
त्यामुळे हमीपत्राची काळजी करू नका. अत्यंत सोपे आहे.
हमी पत्राचा फॉरमॅट खालील लिंकवरून डाऊनलोड करून घ्यावा.
ज्यांच्याकडे पिवळे आणि केशरी रेशनकार्ड नाही त्यांचे स्वयंघोषणापत्र असेल तरी चालते.
डॉक्युमेंटच्या फोटोचे किंवा ईमेजेसचे सपोर्टेट फॉरमॅटच अपलोड होतात.
म्हणजेच जेपीजी, पिएनजी, पीडीएफ जर डाक्युमेंट सपोर्टेड फॉरमॅटमध्ये नसतील तर image not supported on this device हा एरर येऊ शकतो.
म्हणून ईमेजची साईज आणि फॉरमॅट सपोर्टेड पाहिजे. रेड क्रॉस आला नाही याचा अर्थ आपले डॉक्युमेंट ओके आहेत.
आता समजून घेवू आपले कागदपत्र यशश्वीपणे अपलोड झालेत की नाही आपल्याला कसे कळणार ?
तर अपलोड झालेल्या प्रत्येक कागदपत्रासमोर ईमेजची साईज आली असेल.
ती दिसली की समजायचे आपले कागदपत्र यशस्वीपणे अपलोड झाले आहे.
यामध्ये जर ईमेज दिसत नसेल म्हणजेच कागदपत्राचा फोटो जरी दिसत नसेल, थंबनेल दिसत नसेल आणि त्याची फक्त साईज दिसत असेल तरी समजून घ्यायचं की आपले डॉक्युमेंट व्यवस्थति अपलोड झाले आहे.
काही काही लोकांचे फॉर्मस् पेंडीग स्टेटस मध्ये दिसत आहेत.
तर काळजी करू नका. आपल्या डाक्युमेंटचे व्हेरिफिकेश्न चालू आहे. आणि व्हेरिफीकेशन झाल्यावर आपोआप स्टेटस बदलेल आणि फॉर्म सबमिट झाल्याचे दिसेल. त्यामुळे काळजी करू नका आपला फॉर्म आपोआप सबमिट होईल.
सर्वांनी आधारकार्ड नूसारच फॉर्म भरायचा आहे. म्हणजेच आधारकार्डनुसार नाव, जन्मतारिख, पत्ता हे सगळं आधारकार्डसी मॅच झालं पाहिजे. आणि आधारकार्ड बँकेशी ॲटॅच पाहिजे.
कारण आधारकार्डनुसारच डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होणार आहे आणि त्यानूसार डीबीटीद्वारे बँक खात्यात पैसे जमा होणार आहेत.
त्यामुळे असे डॉक्युमेंट द्या ज्यावर एकच नाव, एकच जन्मतारिख आणि एकच ॲड्रेस असेल.
आधार कार्ड बँकेच्या खात्याशी लिंक हवे. रेशनकार्ड आधारकार्डशी लिंक हवे.
मोबाईल नंबर आधार कार्डशी किंवा बँकेशी लिंक नसेल तर चालेल परंतू आधारकार्ड हे बँकेशी लिंक असावे.
आधार कार्ड बँक खात्याशी लिंक कसे करायचे किंवा रेशन कार्ड आधारकार्डशी लिंक कसे करायचे याचा व्हिडीओ लवकरच येणार आहे. त्यामुळे सबक्राईब केले नसेल तर या चॅनलला सबक्राईब करून घ्या.
बँक पासबुकवर आपला फोटो नसेल तर काय?
बँक क्रमांक चुकवू नये. बाकी बँक पासबुकवर फोटो असला काय आणि नसला काय चालेल. बँकेचे अकाऊंट नंबर, आयएफएसी कोड मात्र बरोबर द्यावा लागेल.
बँकेची डिटेल्स चुकली तर पैसे दुसऱ्याच्या खात्यात जातील याची काळजी घ्यावी. बँक पासबूक पाहिजेच असं बंधन नाही.
फक्त एक गोष्ट् लक्षात ठेवा जर आपण ॲड्रेस प्रुफ म्हणून बँकेचे पासबुक वापरत असाल किंवा बँक खात्याचे स्टेटमेंटचा वापरअड्रेस प्रुफ म्हणून वापरत असाल तरच पासबुकची आवश्यकता आहे. अन्यथा पासबुकची आवश्यकता नाही. आपण जो अकाऊंट नंबर देणार आहोत त्या बँकेत आपलं खातं पाहिजे आणि त्या बँकखात्याला आपले आधारकार्ड लिंक पाहिजे.
रेशनकार्ड पंधरा वर्षांपूर्वीचे नसेल तर काय पर्यांय आहेत?
15 वर्षांपूर्वीचे रेशन कार्ड नसेल तर दुसरे कोणतेही कागदपत्र जे 15 वर्षांपूर्वीचे असेल ते द्या.
फक्त हे सिध्द झाले पाहिजे की आपण 15 वर्षांपासून महाराष्ट्राचे रहिवाशी आहात.
म्हणून 15 वर्षांपूर्वीच्या रेशनकार्ड ऐवजी मतदान कार्ड, शाळेचा दाखला, ड्रायविंग लायसन, जन्माचा दाखला इतर कागदपत्र चालतील.
उत्पन्नाचा दाखला नसेल तर काय करायचे?
पिवळे किंवा केशरी रेशनकार्ड असल्यास उत्पन्नाच्या दाखल्याची गरज नाही.
उत्पन्नाच्या दाखल्यासाठी स्वयंघोषित घोषणापत्रसुध्दा चालते. म्हणजे आपल्याकडे जर उत्पन्नाचा दाखला नसेल. रेशन कार्ड नसेल तर आपण स्वयंघोषित घोषणापत्र देवून आपले उत्पन्न हे अडीच लाखांपेक्षा कमी असल्याचे नमूद करून सादर करू शकता.
रहिवाशी दाखल्यासाठी 15 वर्षांची अट आहे.
उत्पनाच्या दाखल्यासाठी 15 वर्षांची अट नाही.
माहेरचे नाव आणि सासरच्या नावात फरक असेल तर काय करावे लागेल?
विवाहित महिलांची दोन नावे असतात. सासरचे नाव आणि माहेरचे नाव. आणि जास्तीत जास्त महिलांनी आपल्या कागदपत्रात नावात बदल करवून घेतलेला नसतो. किंवा त्या दोनही नावे आपल्या कागदपत्रांमध्ये वापरत असतात. अशावेळी विवाह नोंदणी प्रमाणपत्र खुप कामाचे कागदपत्र आहे.
माहेरचे नाव आणि सासरचे नाव यात फरक आहे. हा फरक आधारकार्डवर असेल तरीसुध्दा आधारकार्ड चालते. कारण लक्षात घ्या बऱ्याच महिलांच्या नावात बदल आहे. परंतू त्यांचे आधारकार्ड क्रमांक मात्र एकच आहे. त्यामुळे आधार कार्ड नंबर बदलत नाही. नावातील बदल ग्राह्य आहे आधार क्रमांक मात्र एकच हवा.
वेबसाईट किंवा पोर्टलवरून सुध्दा फॉर्म भरता येणार आहे. त्यासाठी लवकरच नवीन व्हिडीओ अपलोड करण्यात येईल.
फॉर्म पेंडींग दाखवत आहे
आपोआप ठिक होईल. ही आपली जबाबदारी नाही. याचा अर्थ फॉर्मचे व्हेरिफिकेशनची प्रोसेस चालू आहे.त्यात आपण काही करायचे नाही.
रेशन कार्डच्या ठिकाणी उत्पन्नाचा दाखला जोडला तर चालतो का?
होय, चालतो. रेशनकार्डचा दोन प्रकारे वापर होतो. एक म्हणजे उत्पनाचा दाखला म्हणून आणि दुसरे 15 वर्षांपूर्वीचा आदिवासाचा दाखला म्हणून. दोनही पर्यायांना पिवळे व केशरी रेशनकार्ड सादर करू शकता.
OTP आला पण टाकला नाही तरी प्रिंट काढून घेतली तर
एका मोबाईलवरून कितीही फॉर्म भरता येतात. तेव्हा मोबाईल एसएमएसद्वारे ओटीपी व्हेरिफिकेशन करून घ्यावे.
टी सी वरील जन्म तारीख व आधारा वरील तारीख वेग वेगळी आहे ते चालेल का?
नाही चालनार… जी बरोबर असेल तीच टाका, आधारकार्डवर जन्मतारिख चुकली असेल तर दुरूस्त करून घ्या. कारण आधारकार्ड हे महत्वाचे डॉक्युमेंट आहे. आधारकार्ड बंकशी लिंक करून डीबीटीच्या माध्यमातून खात्यावर पैसे जमा होणार आहेत.
सर माझा प्रोब्लेम असा आहे फोटो फक्त फ्रंट लोड झालेत
एडीट ऑप्श्नचा पर्याय आपल्याकडे आहे. बँक आणि फ्रंट एकत्र करून पुन्हा अपलोड करा. अर्जात बदल फक्त एकदाच करता येणार असल्याचं लक्षात ठेवा.
आधार क्रमांक बँकेला जोडला आहे का? याला होय करून सबमिट केले तरी शेवटला नाही दिसते.
ही तांत्रिक चुक असेल. आपण काळजी करून नका. आधार कार्ड बँकेशी लिंक नसेल तर ते करून घ्या.
माझ्या मोबाईलवर एडीट ऑप्श्न येत नाही काय करू?
प्ले स्टोअरला जाऊन आधी नारिशक्त ॲप अपडेट करून घ्यावा.
फक्त अंगणवाडी सेविकाच भरू शकतात का फॉर्म?
आपणही फॉर्म भरू शकता किंवा कुणीही ज्याच्याकडे स्मार्ट मोबाईल आहे. सेतूमध्ये जावूनही फॉर्म भरू शकता. तसेच महानगरपालिका, नगरपालिका इतर ठिकाणीही फॉर्म भरू शकता. बऱ्याच राजकीय पक्षाच्या कार्यालयातही फॉर्म भरून दिला जात आहे.
उत्पन्न प्रमाणपत्र महीलेचे पाहीजेत का महीलेच्या पतीचे
कुटुंबाचे एकत्रित कुटुंब असल्याने अर्थात कुटुंब प्रमुखाचे
अपलोड करण्यासाठी डॉक्युमेंट ची साईज किती हवी?
0 Comments