Subscribe Us

Vishwas Gaikwad and Tausif Khairat Khan यांच्या वतीने गोटे कराड येथे इप्तार पार्टीचे आयोजन


Iftar Party, Vishwas Gaikwad, Iftar Party in Karad, Karad Iftar pary, Gote Iftar Party, Hajrat Khwaja Garib Nawaj, Taufik Khairat Khan


अखंड विश्वाला मानवतेचा संदेश देत विश्वास गायकवाड यांनी गोटे, कराड येथे 27 वा रमजान रोजा निमित्त सर्व मुस्लिम बांधवांसाठी इप्तार पार्टीचे आयोजन केले होते. विभागातील सर्वच मुस्लिम बांधवांनी मोठे संखेने या इप्तार पार्टीमध्ये सहभाग घेतला आणि विश्वास गायकवाड यांच्या या आयोजनाचे कौतूक केले. अनेक मुस्लिम महीलांनी विश्वास गायकवाड यांच्या कार्याला दुवा दिली तर मुस्लिम बांधवांनी सार्वजनिक नमाज पठण करून विश्वास गायकवाड यांच्यासाठी अल्लाकडे दुवा मागितली.  


हाजरत ख्वाजा गरीब नवाज संस्थेचे अध्यक्ष तोफीक खैरत खान यांनी विश्वास गाकवाड यांचे खूप आभार मानले आणि सर्व मुस्लिम समाज विश्वास गायकवाड यांच्या कार्याने भारावून गेला असून गोटे पंचर्कोशित एक नवीन पायंडा त्यांनी पाडला असल्याचे सांगितले. समाज एकत्र करणे मोठे जिकरीचे काम आहे. अशातच बौध्द समाजाच्या कट्टर आंबेडकर वादी भीमसैनिकाने इप्तार पार्टी देणे मोठे पुण्याचे काम आहे. साक्षात या देशाचे घटनाकार, संविधानाचे जनक डॉ. आंबेडकर यांच्या संस्काराची साक्ष देतात. बाबासाहेबांनी सर्व धर्माला संविधानात मानाची जागा दिली. सर्व समाजासाठी न्याय, हक्क, बंधुता आणि प्रेम निर्माण व्हावे यासाठी त्यांनी जीवाचे रान केले. त्याप्रमाणे त्यांच्या सर्व अनुयायांनी एकत्र येवून सर्व समाज घटकांना सामावून बंधुत्व आबाधित राखावे असे आवाहन विश्वा गायकवाड यांनी केला.

Post a Comment

0 Comments