'टिंकर टाइम'ची जागतिक विक्रमाकडे वाटचाल
मुंबई - राष्ट्रीय तंत्रज्ञान दिवसाचे औचित्य साधून 'टिंकर टाईम' या संस्थेमार्फत "पहेली उडान" या भव्य उन्हाळी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. हे शिबीर येत्या ११ मे २०२३ रोजी आयोजित करण्यात आले आहे. "पहेली उडाण' विमानांचे विज्ञान शिकवणाऱ्या शिबिराची व्याप्ती संपूर्ण भारतभर असल्याने हे शिबीर ऑनलाईन पद्धतीचे आहे. भारतात पहिल्यांदाच ऑनलाईन पद्धतीने असंख्य विद्यार्थ्यांना एकाच वेळी प्रशिक्षण देण्यात येत आहे.
लाखो विद्यार्थ्यांना एकाच वेळी एकाच मंचावरून ऑनलाईन पद्धतीने प्रशिक्षण देणे हा एक विक्रम होणार आहे. या विक्रमाची नोंद 'गिनीज बुक ऑफ रेकॉर्ड' मध्ये होणार असल्याचे बोलले जात आहे. प्रत्येक सहभागी विद्यार्थ्याला 'गिनीज बुक ऑफ रेकॉर्ड'चे सन्मानपत्र मिळणार असल्याचे 'टिंकर टाइम' कडून सांगण्यात आले.
टिंकर टाइम हि संस्था गेल्या अनेक वर्षांपासून शालेय विद्यार्थ्यांना विज्ञान, तंत्रज्ञान, गणित आणि इलेक्ट्रॉनिक्स विषयी प्रशिक्षण देते. विज्ञान आणि तंत्रज्ञानाविषयी विद्यार्थ्यांना गोडी लागावी आणि अवघड विषय सोपा होऊन समजावा या संदर्भातील प्रशिक्षणात हि संस्था अग्रेसर आहे. या संस्थेने अनेक शैक्षणिक विक्रम केले आहेत. त्यापैकी 'पहेली उडाण' हा अत्यंत महत्वकांक्षी शैक्षणिक उपक्रम संस्थेने आयोजित केला आहे. याचा फायदा भारतातील लाखो विद्यार्थ्यांना होणार आहे.
'पहेली उडान' या शैक्षणिक उपक्रमातून प्रोत्साहित होऊन अनेक विद्यार्थी 'पायलट' होतील. विमानाचे तंत्रज्ञान शिकून विमान चालनाच्या जगात आपलं करियर करतील. तेव्हा भारतातील सर्व विद्यार्थ्यापर्यंत हा उपक्रम पोहोचला पाहिजे आणि या अनमोल संधीचा फायदा सर्व विद्यार्थ्यांना मिळावा असा संस्थेचा प्रयत्न आहे.
आजच 'टिंकर टाइम' अँप डाऊनलोड करून आपल्या मुलांच्या नावाचे रजिस्ट्रेशन करावे. 'पहेली उडाण' मध्ये आपला सहभाग नोंदवावा असे आवाहन करण्यात येत आहे.
0 Comments